दाऊळ गावातून मोटरसायकल लंपास. दोंडाईचा शहरातील दाऊळ किशोर पांडुरंग पाटील व 58 वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो पाच एफ एल ७४५७ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरादातून माझ्या घराच्या अंगणातून चोरून नेले आहे. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.