अमळथे गावात 42 वर्ष व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या. आनंद सिंग कोमल सिंग गिरासे वय 42 वर्ष सदर व्यक्तीने आपल्या राहत्या घरात फवारणीचे विषारी औषध प्राशन करून बेशुद्ध अवस्थेत घरच्यांना आढळून आला. सदर प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ खाजगी वाहनाने उपचारार्थ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यावरून शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.