खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमी वरती साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचा पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज जलाभिषेक पार पडला. यानंतर शेजारती होऊन मंदिर बंद झाल्यानंतर उद्या दिनांक 8 सप्टेंबर रोजी पहाटे मंदिर उघडून नित्य दिनक्रमाप्रमाणे मंदिर खुल्ल राहणार असल्याची माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीने दिली आहे.