लातूर -लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील आत्माराम धनाजी थेटे (वय 68) हे स्वतःच्या हालअपेष्टा सोसून शेती, मालमत्ता कमावली आणि मुलांना उच्च शिक्षण व संसार उभा करण्यासाठी साथ दिली. मात्र उतारवयात त्यांनाच मुलांकडून छळाला सामोरे जावे लागत आहे. अशी माहिती आत्माराम थेटे यांनी आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे.