परतूर पोलिसांचे शहरात पथसंचलन 30 ऑगस्ट दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहिती वरून गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आष्टी गेट येथून पोलीस ठाणे परतुरपर्यंत पथसंचलन काढण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे आणि पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या उपस्थितीत हे पथसंचलन महादेव मंदिर चौक, शिवाजीनगर चौक, तहसिल कार्यालय चौक, पोलीस ठाणे चौक, मलंगशहा चौक, देशपांडे गल्ली, कुंभार गल्ली, खंडोबा मंदिर, जुना पोस्ट ऑफीस रोड आणि गणपती विसर्जन मार्गाने काढण्यात आले. पथसंचलनाचा समा