नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे जाणापुरी येथे रोडवर दि ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास यातील आरोपी रामचंद्र गायकवाड हा विना परवाना बेकायदेशीररित्या शासनाची राॅयल्टी न भरता आपले ताब्यातील हायवा टिप्पर क्रं एमएच २६ सिएच ७०८६ किमत ३० लाख मध्ये पाच ब्रास रेती किंमती २५ हजार असा एकूण ३० लाख २५ हजारांचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळुन आला.याप्रकरणी आज सायंकाळी सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू.