धुळे एसीपीएम डेंटल कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी चोरीने खळबळ उडाली आहे. डॉ. अश्विनी समिप बंब (२८) यांनी ओपीडी रूममध्ये ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. या बॅगमध्ये ८० हजारांचा लॅपटॉपसह तब्बल २ लाखांचा ऐवज होता. कॉलेजमधील सीसीटीव्हीत आरोपी स्पष्टपणे कैद झाला आहे. तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय खालीदा सैय्यद तपास करत आहेत.