लातूर- लातूर शहरात प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी स्थापित केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन जलाशयात न करता मनपाच्या संकलन केंद्राकडे त्या मूर्ती द्याव्यात सदर मूर्ती घेण्यासाठी मनपाने 15 केंद्र लातूर शहरात उभारले असून या मनपाच्या आव्हानाला लातूरकरांनी मोठा प्रतिसाद देत आज दुपारी बारा वाजल्यापासूनच आपल्या घरात स्थापित केलेल्या गणेशाच्या मूर्ती लातूर शहरातील दयानंद कॉलेजसह विविध केंद्रावर लातूरकरांनी आपल्या घरातील मूर्ती मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रावर आणून देत आहेत.