महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने चंद्रपूरमध्ये पंढरीच्या वारीचा देखावा साकारण्यात आला. श्रीमती उषाताई साळुंके यांच्या निवासस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सुंदर दर्शन घडविण्यात आले. "जगात भारी पंढरीची वारी" या घोषवाक्याला साजेसा हा उपक्रम ठरला. दिवे घाट, वाखरीतील गोल रिंगण, आळंदी ते पंढरपूर मार्गावरील गावांचा नजारा, विठू माऊलीचे मंदिर, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमा अशा आकर्षक सजावटीतून वारकऱ्यांची वारी प्रकट करण्यात आली.