महिलेला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर व्हिडिओ जुने सीबीएस येथील असून सदर व्हिडिओ एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने मोबाईल कॅमेरात काढला आहे.मारहाण करणाऱ्या व्यक्तीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.व्हिडिओमध्ये आपण बघत असाल की,एक इसम एका अनोळखी महिलेला रस्त्यावरून फरपटत घेऊन जात तिला लाथा बुक्क्यानी बेदम मारहाण करीत आहे.सदर महिलेने अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल केली नाही.