ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त ९ सप्टेंबर रोजी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान दगडी आणि लोखंडी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने सर्व वाहतूक राम सेतू पुलावर वळवण्यात आली. सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास या पुलावर प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे फक्त पूल पार करण्यासाठीच नागरिकांना तासभराहून अधिक वेळ लागला. दोन, तीन चाकी वाहन चालकांसह पायदळ जाणाऱ्यांचीही मोठी गैरसोय झाली. काही नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून बायपास पुलाचा वापर करून मार्ग काढला.अचानक झालेल्या या वाहतूक