शिवम वर्मा यांच्या मालकीचे शाम ज्वेलर्स हे ज्वेलरीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सोने व चांदीचे तिन लाख साठ हजार रुपयाचे दागीने पळविले. सदर घटना घोडपेठ येथील दिनांक १२ रोज शुक्रवारला सकाळी ६ वाजता उघडकीस आली.सदर घटना सिसीटिव्ही कैमेऱ्यात कैद झाली. घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात करण्यात आली असुन पोलीस सिसीटिव्ही फुटेज तथा श्वानपथकाच्या सहाय्याने आज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे.