नांदूर नाका येथे निमसे व धोत्रे गटात तुफान हाणामाऱ्या झाल्याची घटना घडली होती.मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे माजी नगरसेवक उद्धव निमसे व त्यांच्या सोबत काही युवक हातात काठ्या व लोखंडी गज घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहे.राहुल धोत्रे व त्याचा मित्र अजय कुसाळकर यांना लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली.दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.