गडचिरोलीच्या दहशतीच्या जंगलात 26 वर्षे अखंड झुंज देणारे व अनेक शौर्यगाथा लिहिणारे C-60 चे पराक्रमी पोलिस उपनिरीक्षक मा. वासुदेव मडावी साहेब यांचा भव्य गौरव सोहळा आज आझाद गणेश मंडळ, अहेरी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. अजय कोकाटे साहेब, उप विभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता, सौ. कोकाटे मॅडम, मा. हर्षल ऐकरे साहेब, पोलिस निरीक्षक अहेरी, तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद दोन्तुलवार व कन्हैय्यालाल कोंडुमल रोहरा आदी मान्यवर उपस्थित होते.