हतनूर धरणाला तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आली हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात उजळून निघेल. *"हर घर तिरंगा"* जनजागृती पंधरवडा कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही रोषणाई करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार, हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय ध्वजाचा गौरव व्यक्त करण्यासाठी हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात उजळून निघेल. हे आयोजन जनजागृतीसाठी आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी करण्यात आले आहे.