औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे केंद्रीय प्राथमिक शाळेच्या जवळील रस्त्यावर 12 सप्टेंबर रोजी अचानक विद्युत वाहिनी तारा तुटून रस्त्यावर पडल्याची घटना घडली सुदैवाने यावेळी रस्त्याने कोणीही येजा करीत नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे तर उघड्या डीपी मुळे शाळेतील 231 विद्यार्थ्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे सदरील डीपी या ठिकाणाहून हाटविण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी महावितरण अधिकाऱ्याला निवेदन दिले आहे परंतु कारवाई झाली नाही