मुरगूड नगरपालिकेने घरफाळा आणि पाणीपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शहरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.अनेक नागरिकांना थकीत फाळा दाखवून जादा कर आकारणीची बिले मिळाल्याचे निदर्शनास आले असून,या वाढीव कराविरोधात आज नागरिकांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता निवेदन दिले.