धोत्रे हत्याकांडातील दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कवटे फाटा व सातपूर येथून ताब्यात घेतले.नांदूर नाका येथे राहुल संजय धोत्रे व त्याचा आत्या भाऊ अजय कुसाळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.यात औषध उपचार दरम्यान राहुल धोत्रे याचा मृत्यू झाला होता.फरार आरोपी संतोष मते हा कवटे फाटा येथे आढळून आला आहे.त्यानुसार सातारा वाचून त्याला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे स्वप्निल बागुल याला सातपूर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.