आज २५ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी दीड वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुनवर्सन अधिकारी श्रध्दा उदावंत, तहसिलदार निलेश खटके यांच्यासह अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.