काँग्रेसच्या वतीने मतचोरीच्या मुद्द्यावरून वोट चोर गद्दी छोड या अभियानाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह विधानसभा क्षेत्र कामठी येथून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी राज्यातील मतदार याद्यांमधील गोंधळ मतचोरीवरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी भाजपाने एका बापाला छप्पन मुले दाखवून मतदार यादीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.