केज तालुक्यातील जिवाची वाडी शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. जिवाची वाडी तलावापासून चिखलबीडकडे जात असलेल्या रस्त्याच्या कडेला या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती संरपंचानी पोलिसांना दिली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.