राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या नेतृत्वात यावल येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्यात आला. स्मार्ट मीटरचे अवास्तव आलेल्या बिलांच्या संदर्भात सदरची आंदोलन करण्यात आले. सदरचे मीटर तातडीने बदलून मिळावे अशी त्यांची मागणी आहे. जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवु देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.