वाळूचे टिप्पर चालू ठेवण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना पाटोदा पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन अर्जुनराव तांदळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. एका टिप्परमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पाटोदा तालुक्यातून वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी हवालदार तांदळे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ही रक्कम स्वीकारताना तांदळे यांना पकडले