आज दि २३ ऑगस्ट रोजी सांय ५:३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड-खुलताबाद रोडवरील हतनूरजवळील शिवना नदीच्या पुलावर सापळा रचून इनोव्हा कारमधून गुटखा वाहतूक करणारा जितेंद्र अशोक कुरलीये (रा. हनुमाननगर, गारखेडा) याला पकडले. वाहनातून विमल पान मसाला, राज निवास व गोवा सुगंधित जर्दा असा सुमारे १३ लाख ७६ हजार ९६० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.