अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे..मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने त्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. जिल्ह्यातील गणेशोत्सव कोणत्याही अडथळ्याविना, शांततेत आणि उत्साहात पार पडावा तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अर्चित चांडक यांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवण्यात आली असून नागरिकांनीही उत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन केले.