अकोल्याच्या संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शेतकरी सन्मान सोहळा व उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा उत्साहात पार पडली. राजीव खान शेख नासीर यांच्या बैलजोडीला प्रथम, तर गोपाल मांडेकर यांना विशेष पारितोषिक मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर राजू गोतमारे, तिसऱ्या स्थानी गजानन सांगे, चौथ्या क्रमांकावर विशाल मेहरे, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे सिकंदर बिस्मिल्ला खान व साजिद मुवाज खान यांची नाव देण्यात आली होती.