येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने रूग्णांना आरोग्याच्या दृष्टीने नेहमीच अडसर निर्माण होत होते. पोंभूर्णा तालूका ग्रामीण भाग असल्याने येथील नागरिकांना चंद्रपूरला सोनोग्राफी करण्यासाठी ये जा करणे खर्चिक आहे. तालुक्यातील या महत्त्वाच्या समस्यांपासून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर यांच्या उपस्थितीत पोंभूर्णा तालूका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.