कल्याण परिसरामध्ये दोन श्वानांचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल आहे. कल्याणच्या लाल चौकी परिसरामध्ये महावितरणच्या तुटलेल्या हायपर टेन्शनच्या वायरला शॉक लागल्याने दोन भटक्या श्वानांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई करण्यात आली. मात्र महावितरण च्या गलथान कारभारामुळे श्वानांच्या जीव गेला असल्याचा आरोप उपस्थित त्यांनी केला आहे.