उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार जयंत शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोटरसायकल चोरीतील संशयित गाडी ही वडनेर येथील एका इसमाकडे आढळून आली आहे.सदरची बातमीची खात्री करून तात्काळ वरिष्ठांना ही माहिती देण्यात आली. सदर ठिकाणी सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन चोरीच्या नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे त्याचे काका सलीम पठाण यांच्यासोबत चोरी केल्याचे त्यांनी कबुली केले आहे.सलीम पठाण अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.