जिल्ह्यातील 750 कर्मचारी संपात सहभागी.राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांनी जुलै महिन्यात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. परंतु सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पुर्ण केल्या नाही. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय अभियानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाही त्यामुळे पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आज आंदोलन स्थळी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी थालीपीठ थालीपीठ आंदोलन केले व या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.