यावल येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी श्रीसंत सावता महाराज समस्त माळी समाज बहुउद्देशीय संस्था साकळी व किनगाव सह परिसरातील समस्त ओबीसी समाज बांधवांनी निवेदन दिले. व महाराष्ट्र शासनाने नुकतेच हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा सदरचे जीआर रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे मराठा समाजाने ओबीसी मध्ये घुसखोरी करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. सदर निवेदन सुभाष महाजन, श्याम महाजन यांनी दिले