उदगीर शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली होती, नऊ दिवस नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,२२ सप्टेंबर पासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली होती, उदगीर शहरात व तालुक्यातील सोमनाथपूर,बोधन नगर, नेहरूनगर देगलूर रोड उदगीर, बोरतळा तांडा,राजराजेश्वरी मंदिर, नागलगाव,आदी विविध ठिकाणी २ ऑक्टोबर रोजी रात्री दुर्गा मातेची ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.मिरवणुकीत अनेक महिला व पुरूषांनी ढोल ताशांवर ठेका धरला