तेल्हारा तालुक्यातील भोकर येथील गट ग्रामपंचायत काळेगावने गेल्या ४ वर्षांत गावात कोणतेही ठोस विकासकाम केले नसल्याचा आरोप वंचित बहुजन युवक आघाडीचे उपाध्यक्ष गणेश महादेवराव तराळे यांनी केला आहे. दरम्यान गावात घरकुल, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी योजनांत भेदभाव झाल्याचा आरोप करत त्यांनी ग्रामसेवकाने सर्व कामांची माहिती आणि हालचाल रजिस्टर जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी केली आहे. येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती तेल्हारा येथे उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.