अकोट शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन सात सप्टेंबर रोजी पार पडणार आहे सार्वजनिक गणेश विसर्जना अंतर्गत शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या भव्य दिव्य गणेश मूर्ती तसेच घरगुती गणपती व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश विसर्जन हे पोपटखेड धरणावरील गणेश घाट येथे होणार आहे. या ठिकाणी प्रशासन व एकलव्य बचाव पथकाच्या मदतीने गणेश घाट सज्ज ठेवण्यात आला असून सुरक्षित गणपती विसर्जनासाठी एकलव्य बचाव पथक व ग्रामीण पोलीस तैनात करण्यात आले आहे.