पालम तालुक्यातील पेठशिवणी गावातील फिर्यादी राधिका करंजे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी 20 ऑगस्ट रात्री नऊ ते 21 ऑगस्ट पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घरफोडी करत कपाटातील 60 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी व रोख 50 हजार रुपये असा एकूण एक लाख 48 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी राधिका करंजे यांच्या फिर्यादीवरून पालम पोलीसात गुन्हा दाखल.