फोंडाघाट, हवेलीनगर येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत अवैध गोवा बनावटीची १ लाख ८१ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी पावलू बस्त्याव पिंटो (वय ३१, रा. फोंडाघाट, हवेलीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कणकवली पोलीस ठाण्यातील गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता देण्यात आली.