स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने घर व गोठ्याला आग लागल्याने घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू व साहित्य जळून राख झाल्याची घटना सोमवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता तालुक्यातील जामखारी येथे घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. यानंतर आग आटोक्यात आली.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील जामखारी येथील शेतकरी गोवर्धन कटरे, हेमंत कटरे, खिलेश्