स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून अडीच कोटी रुपये किमतीच्या व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या कारवाईत ऐक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत दिली.