कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आज (गुरुवार, दि. 11 सप्टेंबर) ला सकाळी 11.30 वाजल्यापासून तहसील कार्यालय परिसरात महसूल सेवकांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कोतवाल संघटनेकडून देण्यात आला आहे.