सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात यंदा 'गो ग्रीन' संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये दररोज सकाळी 'एक पेड मां के नाम' हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचे उद्घाटन अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डाॅ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.