आज दि २७ स्पटेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खुलताबाद तालुक्यात अक्षरश कहर माजवला आहे. शहरासह गल्लेबोरगाव, पिंपरी, निरगुडी, तिसगाव, आखतवाडा व चिंचोली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. तर बाजार सावंगी, इंदापुर व सुलतानपुर भागात तुफानी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे.वडोद परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला आहे.