अहिल्यानगर ग्रामदैवत मानाचा विशाल गणपतीची उत्सव मूर्ती रात्री साडेआठ वाजता वेशीबाहेर पडली सजवलेल्या रथामधून मार्गस्थ होत असलेल्या या मूर्तीचा दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते आपल्या मोबाईलच्या कॅमेरात त्यांनी क्षणचित्रे टिपली आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील केली गिरीश जाधव यांच्या दिल्लीगेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने याही वर्षी या ठिकाणी डीजे लावण्यात आला होता गाण्यांच्या तालावर तरुणाईने ठेका धरला संबळ आणि ढोल पथकांची साथ संगत यावेळी मिळाली.