पडोली विचोडा परिसरातुन सीटीपीएसच्या रिजेक्ट कोल गेट पासून आवंठा डैम कडे जाणारा रस्तावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखलमय झाल्यामुळे दयनीय अवस्था झाली आहेत.दुरुस्तीबाबत सीटीपीएस आणि पीडब्ल्यूडी प्रशासन टाळाटाळ करणारी उत्तरे देत आहे. खासदार आणि आमदार यांचेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पुढील १५ दिवसांत समस्या सोडवली नाही तर रस्त्यावरील सीटीपीएस ची वाहतूक बंद करण्याचा इशारा माजी नगरसेवक सुरेश पचारे यांनी आज दि २८ आगस्ट ला ३ वाजता श्रमिक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.