जिंतूर येथुन एम एच 14 एम एच 1959 ही बस परभणीसाठी निघाली होती. जिंतूर परभणी मार्गावर चांदज जवळ ही बस आली असता पिकअप वाहन क्र.एम एच 15 सी.के.7910 च्या चालकाने कुठल्याही प्रकारचा इशारा इंडिकेटर न देता वाहन निष्काळजीपणे चालवून अचानक उजवीकडे वळल्याने बसचा अपघात झाल्याने काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या तर बसचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.ही घटना गुरुवार 11 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी बस चालक शेख आरेफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरोधात बोरी पोलीसात गुन्हा दाखल.