भुसावळ शहरात नगरपालिकेच्या वतीने प्रमुख मार्गावरील काँक्रीटी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे बस स्थानक रेल्वे स्टेशन व मुख्य बाजारपेठेकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मुख्य रस्ते बंद असल्याने शहरातील गल्ल्याबोळ्यांमधून वाहनधारकांना वाट काढावी लागत असून त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.