मामुर्डी गाव मासुळकर सिटी ते एक्सप्रेस हायवे ब्रिज हा रोड गेल्या अनेक वर्षापासून डांबरीकरण केलेला नसून त्याची झालेली दुरावस्था या संदर्भात या ठिकाणी ठिय्या सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले. परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार हे आंदोलन थांबवले असून तरी गणपती विसर्जन नंतर हा रोड पाऊस संपल्यानंतर चांगल्या पद्धतीत डांबरीकरण केला नाहीतर पुन्हा तीव्र आंदोलन करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस व त्यांच्या सहकाऱ्यांनी देऊन हे आंदोलन स्थगित केले.