जालना शहरातील मंगळबाजार भागात एका कत्तलखान्यात गाय कापतानाचा व्हिडीओ व्हायरल करणार्या एका आरोपीला शनिवार दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता परभणी जिल्ह्यातील जम-जम कॉलनी दर्गा रोड येथून ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली. सोफियान समद कुरेशी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून दुसरा संशयीत आरोपी हा गंगाखेडचा असून त्याचा त्यात सहभाग आहे की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत. गाय कापतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच हिंदू समाज आक्रमक झाला होता.