नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलाखाडी गाव पाड्यावर अतिदुर्गम भागात केलाखाडी नदीवर झाडाच्या फांदीवरून जीवघेणा प्रवास ग्रामस्थांचा सुरू होता. या बातमीची दखल घेत जिल्हा प्रशासनानं साकव पुल नदीवर तयार केला आहे. ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.