अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून योग्य उपचार केला जात नाही असा गंभीर आरोप बहुजन समाज पार्टीच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री गवई यांनी अकोला जिल्हाधिकारी मार्फत आरोग्य मंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केला आहे. रुग्णा सोबत होणारी हडसाळ तात्काळ थांबून चौकशी समिती गठीत करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.