मुंब्रा परिसराच्या जुन्या टोलनाक्याजवळ एक व्यक्ती गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथका ठाणे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत दोन कोटी ३७ लाख ४० हजार रुपये किमतीचा दोन किलो 374 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 19 टॅबलेट आणि इतर साहित्य असा दोन कोटी 38 लाख 87 हजार 590 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 21 वर्षीय सुमित राजकुमार कुमावत नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.